Thursday, 22 August 2019

आशा भोसले आणि जनाई भोसले यांनी रजिता कुलकर्णी यांच्यासह श्री श्री रविशंकर यांच्या कृतज्ञतेत गाण्यांची घोषणा केली.


ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले आणि नात जनाई भोसले यांनी गीतकार रजिता कुलकर्णी यांच्यासह अंधेरी पश्चिम येथील पंचम स्टुडिओ येथे आध्यात्मिक आणि मानवतावादी गुरु श्री श्री रविशंकर यांच्या कृतज्ञतेत गाण्यांची घोषणा केली. आशा भोसले यांनी त्यापैकी एक गाणे गायले आहे, तर जनाई भोसलेने दुसरे गाणे गायले आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना या गाण्यांविषयी माहिती आहे का? असे विचारले असता, आशा भोसले यांनी व्यक्त केले की, “मी गुरुदेवांशी गाण्यांबद्दल काही बोलने झाले नाही, परंतु मी त्यांना बर्‍याच वेळा भेटले आहे. त्यांच्या इतर सर्व अनुयायांप्रमाणे मी देखील त्यांना प्रिय आहे.”

ज्येष्ठ गायिका आशा भोसले ह्या गाण्याच्या निवडीबददल म्हणाल्या की,“ सर्व गाणी नृत्य किंवा प्रेमाविषयीचं असतात असे नाही. इतर भावना देखील आहेत, विशेषत: त्या ज्या आपल्याला देवाशी जोडतात आणि गुरुदेव यांच्या कृतज्ञतेत रचलेली ही गाणी आपल्याला भगवंताशी जोडतात.” योगायोगाने आशा भोसले यांनी या गाण्यांना संगीत देखील दिले आहे.

जनाई भोसलेचे तिच्या आजीबरोबरचे हे पहिलेचं सहकार्य नाही! ह्या गाण्याबद्दल सांगताना जनाई म्हणते की, “हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. ती माझी आजी आहे! आम्ही जगभर प्रोफेशनली म्युजिक कॉन्सर्ट मध्ये परफॉर्म केले आहे, पण जेव्हा आम्ही घरी परततो, तेव्हा ती माझी आजी असते जी माझ्यासाठी माझे आवडते जेवण बनवते... तिच्यात काहीच बदल होत नाही.” युवा प्रतिभावान गायिका जनाई ने श्री श्री रविशंकर यांच्या प्रति तिची निष्ठा व्यक्त करत  म्हटले की, "मी स्वतःला भाग्यवान समजते कि मला त्यांच्यासाठी गाण्याची संधी मिळाली."

अध्यात्माबद्दल त्यांच्या समान कल्पनाशिवाय, आजी-नाती ची ही जोडी एक आपुलकीचे बंध साधते. याबद्दल सांगताना आशा भोसले सांगतात की, “जनाई मला अजिबात त्रास देत नाही! ती खरोखर चांगला स्वयंपाक करते आणि प्रेमाने मला खाऊ घालते. सभ्यतेची तिला जाण आहे. ती आमच्या कुटुंबाला एकत्र बांधते. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिला भारतीय शास्त्रीय संगीताचे आणि शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि आता ती वेस्टर्न ऑपेरा शैलीत सुद्धा गाते. आता ती १७ वर्षांची असून शालेय शिक्षणासह संगीतात हि तालीम घेत आहे.”

No comments:

Post a Comment