कुमार सानु, अभिजीत भट्टाचार्य, अलका याग्निक आणि ललित पंडित यांच्या मधुर स्वरांनी परिपूर्ण नवीन गाण्यांसह ललित पंडित यांनी संगीत क्षेत्रतील अविस्मरणीय काळातील सोनेरी गीत परत आपल्या भेटीस आणले आहे. ही रोमँटिक गाणी टीव्हीएफ आणि एमएक्स प्लेयरवरील फ्लेम्सच्या दुसर्या सीझनच्या कथेचा अविभाज्य भाग आहेत. योगायोगाने फ्लेम्सच्या पहिल्या सीझनमध्ये जतिन-ललित यांच्या पेहला नशा, ये वादा रहा यांसारख्या सदाबहार गाण्यांचा समावेश असलेला दिसून येतो.
ललित पंडित सांगतात की, "फ्लेम्स या वेब सिरीज चे निर्माते, जतिन-ललित यांच्या संगीताची आवड असणारे तरुण आहेत. या सिरीजच्या दुसऱ्या सिजनसाठी ९०च्या काळातील संगीतातील अमरत्व कायम ठेवत मी ही नवीन गाणी तयार करावीत व ती कुमार सानू, अलका याज्ञिक आणि अभिजीत भट्टाचार्य यांसारख्या दिग्गजांच्या स्वरात असावीत अशी त्यांची ईच्छा होती. ही गाणी स्वरबद्ध करताना सर्व गायक देखील तितकेच उत्साही होते आणि जेव्हा आपण एपिसोड पाहता तेव्हा आपल्याला त्या अभिनेत्यांशी जुळणारा ताजेपणा आणि तरूण ऊर्जा या गाण्यांतून दिसून येते."
फ्लेम्स या वेब सिरीज मध्ये तीन गाणी असून आलोक रंजन झा यांच्या लेखणीतून ती अवतरली आहेत. संगीत दिग्दर्शक ललित पंडित यांनी ही गाणी कुमार सानू, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य व स्वतःच्या मधूर स्वरांनी स्वरबद्ध केलेली आहेत.
१)"खामोशिया लबोंपे है, दिल मे हैं जादुगरी|"
गायक - कुमार सानू, अलका याज्ञिक
२) "कुछ तो दिल ने दिल से कहा हैं|"
गायक - ललित पंडित
३) "थामे दिल को कब से मै खडा हू राहो मे|"
गायक - अभिजीत भट्टाचार्य
No comments:
Post a Comment